Renewable Energy Stocks : आज नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली घसरण आली तरी,या क्षेत्रातील वाढीची क्षमता अजूनही चांगली आहे.
भारत सरकारचे नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे धोरण आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासंबंधी वाढलेली जागरूकता यामुळे या क्षेत्रात दीर्घकाळात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो,गुंतवणूकदारांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis), तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि बाजारातील एकूण स्थितीचा विचार करणे आवश्यक असते.आज आपण सध्या आणि भविष्यात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय पाहणार आहोत.
Renewable Energy Company Stocks
1) Energy Development Company Ltd.
एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी ही एक लहान कंपनी असून तिचे बाजार भांडवल 90 कोटी रुपये आहे.दि.६ एप्रिल २०२५) तिच्या शेअरच्या किमतीत 1.82% वाढ झाली आहे. मात्र, कंपनीचा PE रेशो नकारात्मक (-41.63) आहे आणि आरओई देखील नकारात्मक (-2.14%) आहे, जे दर्शवते की कंपनी सध्या नफ्यात नाही आहे आणि तिच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत नाही.
- शेअरची किंमत : 18.99 ₹
- 1 दिवसातील बदल : +1.82%
- बाजार भांडवल : 90 कोटी ₹
- PE : – 41.63
- ROE : -2.14%
2) Zodiac Energy Ltd.
झोडियाक एनर्जी ही मध्यम आकाराची कंपनी असून तिचे बाजार भांडवल 615 कोटी रुपये आहे. आज तिच्या शेअरच्या किमतीत 0.17% ची किरकोळ वाढ झाली आहे.कंपनीचा PE रेशो 37.88 आहे.
जो दर्शवतो की गुंतवणूकदार कंपनीच्या कमाईसाठी प्रीमियम देण्यास तयार आहेत. तसेच, कंपनीचा आरओई 23.06% आहे.जो चांगला मानला जातो आणि दर्शवतो की कंपनी भागधारकांच्या इक्विटीवर चांगला परतावा निर्माण करत आहे.
- शेअरची किंमत : 407.45 ₹
- 1 दिवसातील बदल : +0.17%
- बाजार भांडवल : 615 कोटी ₹
- PE : 37.88
- ROE : 23.06%
3) NHPC Ltd.
एनएचपीसी ही एक मोठी सरकारी कंपनी असून तिचे बाजार भांडवल 83,414 कोटी रुपये आहे. आज तिच्या शेअरच्या किमतीत 1.76% घट झाली आहे.कंपनीचा PE रेशो 23.00 आहे. आरओई 9.36% आहे. सरकारी मालकीची आणि जलविद्युत क्षेत्रात कार्यरत असल्याने ही कंपनी स्थिर मानली जाते.
- शेअरची किंमत : 83.04 ₹
- 1 दिवसातील बदल : – 1.76%
- बाजार भांडवल : 83,414 कोटी रुपये
- PE : 23.00
- ROE : 9.36%
4) Inox Wind Ltd.
इनॉक्स विंड ही पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेली मोठी कंपनी असून तिचे बाजार भांडवल 20,059 कोटी रुपये आहे. आज तिच्या शेअरच्या किमतीत 2.97% घट झाली आहे. कंपनीचा PE रेशो खूप नकारात्मक (-496.77) आहे. आरओई देखील नकारात्मक (-2.38%) आहे.जे दर्शवते की कंपनीला सध्या नफा मिळवण्यात अडचणी येत आहेत.
- शेअरची किंमत : 153.85 ₹
- 1 दिवसातील बदल : -2.97%
- बाजार भांडवल : 20,059 कोटी
- PE : -496.77
- ROE : -2.38%
5) Indian Renewable Energy Development Agency Ltd.
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (IREDA) ही नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी सरकारी संस्था आहे. तिचे बाजार भांडवल 42,050 कोटी रुपये आहे.आज तिच्या शेअरच्या किमतीत 3.13% घट झाली आहे. कंपनीचा PE रेशो 27.33 आहे. आरओई 14.62% आहे, जे दर्शवते की कंपनी चांगला नफा कमावत आहे.भागधारकांच्या इक्विटीवर चांगला परतावा देत आहे.
- शेअरची किंमत : 156.45 रुपये
- 1 दिवसातील बदल : -3.13%
- बाजार भांडवल : 42,050 कोटी रुपये
- PE : 27.33
- ROE : 14.62%
6) Indowind Energy Ltd.
इंडोविंड एनर्जी ही लहान कंपनी असून पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. तिचे बाजार भांडवल 219 कोटी रुपये आहे.आज तिच्या शेअरच्या किमतीत 3.14% घट झाली आहे.
कंपनीचा PE रेशो 30.13 आहे. आरओई 3.08% आहे,जे दर्शवते की कंपनी नफ्यात आहे,पण परताव्याचे प्रमाण मध्यम आहे.
- शेअरची किंमत : 16.97 रुपये
- 1 दिवसातील बदल : -3.14%
- बाजार भांडवल : 219 कोटी रुपये
- PE : 30.13
- ROE : 3.08%
7) Adani Green Energy Ltd.
अदानी ग्रीन एनर्जी ही भारतातील सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. तिचे बाजार भांडवल 1,46,333 कोटी रुपये आहे.आज तिच्या शेअरच्या किमतीत 3.30% घट झाली आहे.कंपनीचा PE रेशो 133.06 आहे.यावरून असे स्पस्त होते की, गुंतवणूकदार कंपनीच्या भविष्यातील वाढीच्या जास्त किंमत देण्यास तयार आहेत.कंपनीचा आरओई 13.07% आहे, जो चांगला आहे.
- शेअरची किंमत : 923.80 रुपये
- 1 दिवसातील बदल : -3.30%
- बाजार भांडवल : 1,46,333 कोटी रुपये
- PE : 133.06
- ROE : 13.07%
8) Orient Green Power Company Ltd.
ओरिएंट ग्रीन पॉवर ही नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पात कार्यरत असलेली कंपनी आहे.तिचे बाजार भांडवल 1,425 कोटी रुपये आहे. आज तिच्या शेअरच्या किमतीत 3.49% घट झाली आहे. कंपनीचा PE रेशो 38.54 आहे आणि आरओई 4.63% आहे,जे दर्शवते की कंपनी नफ्यात आहे पण परताव्याचे प्रमाण मध्यम आहे.
- शेअरची किंमत : 12.15 रुपये
- 1 दिवसातील बदल : -3.49%
- बाजार भांडवल : 1,425 कोटी रुपये
- PE : 38.54
- ROE : 4.63%
9) SJVN Ltd.
एसजेवीएन ही सरकारी मालकीची जलविद्युत निर्मिती कंपनी आहे. तिचे बाजार भांडवल 36,319 कोटी रुपये आहे.आज तिच्या शेअरच्या किमतीत 3.50% घट झाली आहे. कंपनीचा PE रेशो 39.67 आहे.आरओई 6.47% आहे. ही कंपनी स्थिर मानली जाते आणि नियमित लाभांश देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
- शेअरची किंमत : 92.42 रुपये
- 1 दिवसातील बदल : -3.50%
- बाजार भांडवल : 36,319 कोटी रुपये
- PE : 39.67
- ROE : 6.47%
10) Suzlon Energy Ltd.
सुझलॉन एनर्जी ही पवन टर्बाइन बनवणारी भारतातील मोठी कंपनी आहे. तिचे बाजार भांडवल 75,559 कोटी रुपये आहे.आज तिच्या शेअरच्या किमतीत 3.70% घट झाली आहे. कंपनीचा PE रेशो 113.68 आहे, जो जास्त आहे, पण कंपनीचा आरओई 16.84% चांगला आहे, जो दर्शवतो की कंपनी भागधारकांच्या इक्विटीवर चांगला परतावा देत आहे.
- शेअरची किंमत : 55.36 रुपये
- 1 दिवसातील बदल : -3.70%
- बाजार भांडवल : 75,559 कोटी रुपये
- PE : 113.68
- ROE : 16.84%
11) JSW Energy Ltd.
जेएसडब्ल्यू एनर्जी ही ऊर्जा क्षेत्रातील एक मोठी खाजगी कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 88,507 कोटी रुपये आहे.आज तिच्या शेअरच्या किमतीत 3.94% घट झाली आहे.कंपनीचा PE रेशो 51.34 आहे आणि आरओई 8.26% आहे.सदरील कंपनी वीज निर्मिती आणि पारेषण क्षेत्रात कार्यरत आहे.
- शेअरची किंमत : 506.40 रुपये
- 1 दिवसातील बदल : -3.94%
- बाजार भांडवल : 88,507 कोटी रुपये
- PE : 51.34
- ROE : 8.26%