PM Aawas Yojana : “सर्वांसाठी घरे” हे केंद्र शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे.राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात.
प्रधानमंत्री आवास योजना | PM Aawas Yojana
राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान योजना राबविण्यात येत आहेत.प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गांकरीता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येतात.
राज्यात प्रामुख्याने ‘अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरीता ‘रमाई आवास योजना’, ‘अनुसूचित जमाती’ करीता ‘शबरी आवास योजना’ व ‘आदिम आवास योजना’ तसेच ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती’ करीता ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना’, ‘इतर मागास वर्ग’ प्रवर्गासाठी ‘मोदी आवास योजना’ इत्यादींचा समावेश आहे.
सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, टप्पा-१ सन २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या कालावधीसाठी सुरु केला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.
घरकुल योजना अनुदान वाढ
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गतकेंद्र शासनाकडून राज्य शासनाला १९.६६ लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत मा. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती.
आता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा-२ मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ तसेच विविध राज्यपुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत, सन २०२४-२५ मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रु. ५०,०००/- एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदरील रु. ५००००/- रक्कमेमधून रु. ३५०००/- अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर, रु. १५०००/- इतके अनुदान हे प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतून छतावर १ KW मर्यादेपर्यंत सौर उर्जा यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर उर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील रु. १५०००/- अनुदान देय असणार नाही.
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ ते २०२८-२९ मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शासन निर्णय दिनांक १४.१०.२०१६ यामध्ये नमूद केलेल्या इतर सर्व बाबी कायम राहतील.
प्रधानमंत्री आवास योजना पात्रता निकष
१. कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा (Family Income Limit) :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची विभागणी त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार केली जाते. त्यानुसार पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.
- Economically Weaker Section – EWS (आर्थिक दुर्बळ घटक) : – ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी आहे, ते या गटात येतात.
- Lower Income Group – LIG (निम्न उत्पन्न गट) :- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाखांपर्यंत आहे, ते या गटात येतात.
- Middle Income Group – MIG-I (मध्यम उत्पन्न गट – १ ) :- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ ६ लाख ते ₹ १८ लाखांपर्यंत आहे, ते या गटात येतात.
- Middle Income Group – MIG-II (मध्यम उत्पन्न गट – २) : – ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख ते १८ लाखांपर्यंत आहे, ते या गटात येतात.
२. स्वतःच्या मालकीचे पक्के घर नसावे (No Existing Pucca House) :- अर्जदाराच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारतात कोठेही स्वतःच्या मालकीचे पक्के घर नसावे. जर अर्जदाराकडे आधीपासून पक्के घर असेल, तर तो या योजनेसाठी पात्र ठरत नाही.
३. कुटुंबाची व्याख्या (Definition of Family) :- या योजनेसाठी ‘कुटुंब’ म्हणजे पती, पत्नी आणि अविवाहित मुले. विवाहित मुलांचा समावेश स्वतंत्र कुटुंब म्हणून केला जातो.
४.आधार कार्ड अनिवार्य (Aadhaar Card Mandatory) :– प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
५. लाभार्थीने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदार भारताचा नागरिक असावा.
घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. कागदपत्रे तुमच्या उत्पन्नाचा,पत्त्याचा आणि ओळखीचा पुरावा म्हणून काम करतात.
ओळखीचा पुरावा (Proof of Identity)
- आधार कार्ड : हे सर्वात महत्त्वाचे आणि अनिवार्य कागदपत्र आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
- पॅन कार्ड : (असल्यास)
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पत्त्याचा पुरावा (Address Proof)
- आधार कार्ड (पत्त्याचा पुरावा म्हणून देखील वापरले जाते)
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
- शिधापत्रिका (Ration Card)
- वीज बिल (Electricity Bill)
- पाणी बिल (Water Bill)
- टेलीफोन बिल (Telephone Bill)
- बँक स्टेटमेंट (Bank Statement)
- घरपट्टी/मालमत्ता कर पावती (Property Tax Receipt)
उत्पन्नाचा पुरावा (Income Proof)
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) तहसील किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला.
- वेतन स्लिप (Salary Slip): जर तुम्ही नोकरी करत असाल तर मागील काही महिन्यांच्या वेतन स्लिप.
- बँक स्टेटमेंट (Bank Statement) : मागील काही महिन्यांचे बँक स्टेटमेंट ज्यामध्ये तुमच्या उत्पन्नाचे व्यवहार दिसत असतील.
- आयकर रिटर्न (Income Tax Return – ITR) : (असल्यास)
- शपथपत्र (Affidavit) : काहीवेळा उत्पन्नाचा औपचारिक पुरावा नसल्यास सादर करावे लागू शकते.
इतर आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate) : जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून अर्ज करत असाल तर.
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate) : जर अर्जदार दिव्यांग असेल तर.
- घोषणापत्र/शपथपत्र (Declaration/Affidavit) : तुमच्या मालकीचे पक्के घर नसल्याबाबत आणि इतर माहितीसाठी.
- मनरेगा जॉब कार्ड (MGNREGA Job Card) : (ग्रामीण भागासाठी असल्यास)
- स्वच्छ भारत मिशन (SBM) क्रमांक : (असल्यास)
- बँक पासबुकची झेरॉक्स : ज्यामध्ये लाभार्थीचे नाव, खाते क्रमांक आणि बँकेचा पत्ता स्पष्टपणे नमूद असेल. कारण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत थेट याच खात्यात जमा होते.
- पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photographs) : अर्जदाराचे आणि कुटुंबातील सदस्यांचे
How to Apply for Gharkul Yojana?
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे.
- ऑनलाइन अर्ज : योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
- ऑफलाइन अर्ज : तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत किंवा गृहनिर्माण संस्थेत जाऊन योजनेचा अर्ज भरू शकता.