Family Pension : दि.१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दि.३१.१०.२००५ व दि.०७.०७.२००७ रोजीच्या शासन निर्णयांन्वये लागू करण्यात आली आहे.
आता याच धर्तीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील शासन मंजूर पदांवर दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांना नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली होती.
DCPS NPS Employee’s Family Pension
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत.
केंद्र शासनाच्या Central Civil Services (Implementation of National Pension System) Rules, 2021, दिनांक ३०.०३.२०२१ व Central Civil Services (Payment of Gratuity under National Pension System) Rules, २०२१, दिनांक २३.०९.२०२१ रोर्जीच्या अधिसुचनांच्या धर्तीवर शासन निर्णयान्वये दिनांक १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा निवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणा-या कर्मचा-यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय केले आहे.
जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात आली आहे. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना वित्त विभागाने केली आहे. सदर सुचनेस अनुसरून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील शासन मंजूर पदावर कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश पारीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील शासन मंजूर पदावर दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा
कुटुंब निवृत्तीवेतन, मृत्यू उपदान,रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा निवृत्ती उपदान
(अ) सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान,
(ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा निवृत्ती उपदान लागू करण्यात
येत आहे.सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल.
(क) तसेच विद्यापीठ सेवेतून निवृत्त होणा-या कर्मचा-यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
Family Pension for NPS Employee
सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्य:स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदी लागू राहतील.
१. दिनांक ०१.११.२००५ ते या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना-३ मधील विकल्प, कार्यालय प्रमुख, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचेकडे सादर करावा लागेल.
२. कुटुंब निवृत्तीवेतनधारकास त्याला मिळालेल्या परिभाषित निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल. सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील.
३. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेला व यापुढे विद्यापीठ सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तीवेतन लेखा क्रमांक (PRAN) मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तीवेतन निधी विनियमक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबत सोबतच्या नमुना-२ मध्ये विकल्प कार्यालय प्रमुख, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचेकडे सादर करावा.
४. जे विद्यापीठ कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील, त्यांनी नमुना-१ प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे.
५. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व कर्मचा-यांनी सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्र.३ प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील. तसेच यापुढे विद्यापिठाच्या सेवेत नियुक्त होणा-या कर्मचा-यांनी नियुक्तीपासून ८ दिवसाच्या आत्त उपरोक्तप्रमाणे विकल्प सादर करणे आवश्यक राहील.
६. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सेवेतुन निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती उपदानापोटी होणारा खर्च खालील लेखाशिर्षांतर्गत खर्ची टाकण्यात यावा.