State Employees : मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगविषयक कारवाई संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित …

State Employees : नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये शिस्तबंग होत असताना करावयाच्या कारवाईचा समावेश आहे,तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर …

शासकीय कामकाजात गतिमानता व खर्चात बचत होण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय कार्यालयात आता ई-मेल सुविधेचा वापर होत असून प्रसंगी व्हॉट्सॲपचा वापर देखील करण्यात येत आहे. 

माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासकीय कामकाजाला गती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिस्तभंगविषयक कारवाई मध्ये देखील सदर माध्यमांचा वापर करणे ही काळाची गरज ठरते.

State Employees New Rules

शिस्तभंगविषयक कारवाईमध्ये नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार अपचाऱ्यास अभिवेदन करण्याची संधी उपलब्ध असणे अत्यावश्यक असते. त्यासाठी त्याचेपर्यंत शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचा पत्रव्यवहार पोहोचणे गरजेचे आहे. 

सद्यस्थितीत शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याकडून अपचाऱ्याशी होणारा पत्रव्यवहार व्यक्तीशः अथवा पोच देय नोंदणी डाकेने करण्यात येतो. तथापि, काही वेळेस सदर पत्रव्यवहार (दोषारोपाचे ज्ञापन, चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल इ.) त्याचेपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्य शासनांतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अथवा नियम १० याखाली तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ च्या पोट-नियम (२) (ब) (एक) याखाली बजाविण्यात येणारे दोषारोपाचे ज्ञापन तसेच इतर शिस्तभंगविषयक कागदपत्रे संबंधित अपचाऱ्यास बजाविण्याबाबत खालील माध्यमांचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाई नियम

१) शिस्तभंगविषयक कागदपत्रे व्यक्तिशः बजाविणे :- शासकीय कर्मचारी कर्तव्यार्थ उपस्थित असल्यास शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याकडून त्यास संबंधित कागदपत्रे /पत्रव्यवहार व्यक्तीशः बजाविण्यात यावे किंवा ती त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत देण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि ती कागदपत्रे/पत्रव्यवहार मिळाल्याची त्याच्याकडून पोच घेण्यात येणार आहे.

२) शिस्तभंगविषयक कागदपत्रे पोच देय नोंदणी डाकेने (RPAD) बजाविणे :-अपचाऱ्यास पोच देय नोंदणी डाकेने संबधित कागदपत्रे/पत्रव्यवहार पाठविण्यात यावे.

उपरोक्त माध्यमांचा अनिवार्यपणे वापर करण्यात येईल. तसेच याद्वारे प्राप्त झालेली पोच प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडून ठेवण्यात येईल.

३) उपरोक्त कार्यवाही सोबतच अपचाऱ्यास अधिक जलदगतीने यासंबंधातील कागदपत्रे/पत्रव्यवहार प्राप्त होऊन त्यास आपले अभिवेदन सादर करता यावे. याकरीता खालील माध्यमांचाही वापर करण्यात यावा 

अ) शिस्तभंगविषयक कागदपत्रे शासकीय ई-मेलद्वारे बजाविणे :- शासकीय ई-मेल आयडी द्वारे संबंधित अपचाऱ्यास त्याच्या शासकीय ई-मेल आयडी वर तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्याच्या वैयक्तिक ई-मेल आयडी वर शिस्तभंगविषयक कारवाई मधील कागदपत्रे बजाविण्यात येणार आहे. (संबंधित अपचाऱ्याने त्याच माध्यमान्वये पोच देण्यात येईल)

आ) शिस्तभंगविषयक कागदपत्रे व्हॉट्सॲप द्वारे बजाविणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंटवर शिस्तभंगविषयक कारवाई मधील कागदपत्रे बजाविण्यात येणार आहे. (संबंधित अपचाऱ्याने त्याच माध्यमान्वये पोच देण्यात येईल)

Leave a Comment