School Admission : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 29 जुलै, 2020 रोजीच्या बैठकीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.”राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020″ नुसार शिक्षण क्षेत्रात कोणकोणते नवीन प्रयोग केले जाणार आहेत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिली मध्ये दाखल वय! जाणून घेऊया सविस्तर माहिती.
National Education Policy 2020
देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीचे वय वेगवेगळे होते.गेल्या वर्षी पहिली इयत्तेतील प्रवेशासाठी भारतातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलांच्या 6 वर्षे वय असण्याचा नियम लागू नव्हता. येथे मुलांना वयाची 6 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पहिली इयत्तेत प्रवेश घेण्याची परवानगी होती.
नवीन शैक्षणिक धोरण 2020
भारतातील गुजरात,तेलंगणा,लडाख,आसाम आणि पुद्दुचेरी ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जेथे 5 वर्षांच्या मुलांनाही पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जात असे मात्र आता सरकारने नवीन नियम लागू केला आहे.
इयत्ता पहिली प्रवेश वय | School Admission 2023
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी बालकाचं वय 6 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.सहा वर्ष पूर्ण नसल्यास विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. केंद्र सरकारकडून शैक्षणिक नियमांमध्ये हा मोठा बदल करण्यात आला आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठीचा मुलभूत टप्पा आहे.
शैक्षणिक दिनदर्शिका 2023 – 2024 येथे पहा