Mcx cotton market : 2022 मध्ये वर्षी भारतात कापसाचे दर १४ हजारांवर पोहोचल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन ऐवजी कापसाला पसंती दिली.पण या वर्षी फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला योग्य तो भा’व मिळत नाही.परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच कापसाचे द’र केव्हा वाढतील हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
MCX cotton market live
जर बांगलादेशाचे कापूस cotton आयत करण्याचे प्रमाण पाहिले तर ते भारतातून 41 % कापसाची आयात करतो.परंतु सध्या बांगलादेश मध्ये आर्थिक संकट तसेच राजकीय अस्थिरता असल्यामुळे त्याचा फटका हा तेथील कापड उद्योगाला बसतोय.
बांगलादेशात परकीय चलनाची टंचाई निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा भारतीय कापूस बाजार (MCX cotton market live) वर दिसून येत आहे. बांगलादेश हा सर्वात मोठा भारतातून कापूस आयात करणारा एक देश आहे.बांगलादेश कडून अद्याप देखील आयात केली नाही.यामुळे याचा प्रतिकुल परिणाम कापसाच्या द’रावर दिसून येत आहे.
MCX cotton live
भारतातील एकूण कापूस निर्यातीच्या 54.83 लाख गाठीपैकी एकट्या बांगलादेशातून 22.9 लाख इतक्या गाठी खरेदी केली होती.मागच्या वर्षी भारताकडून 25 लाख गाठी निर्यात करण्यात आल्या होत्या.पण या वर्षी तुलनेने फारच कमी म्हणजे 5 लाख गाठी निर्यात केल्याची माहीती आहे.
आजचे ताजे कापूस बाजार येथे पहा